शिव सप्ताहाचे मा.सत्यपाल महाराजांच्या हस्ते थाटात उद्घाटन

24

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

अकोला(दि.13फेब्रुवारी):- छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क अकोला येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने साजरा होत असलेल्या शिव सप्ताहाचे मा.सत्यपाल महाराजांच्या हातून थाटात उद्घाटन करण्यात आले.

यावेळी समितीचे अध्यक्ष भैय्यासाहेब उर्फ अविनाश देशमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक विजयजी कौसल, विनायकरावजी पवार, राजाभाऊ देशमुख, उद्योजक विवेक पारसकर, प्रदीप खाडे, सरफराज खान सर, रामजी मुळे, डॉ. अशोकजी ओळंबे, कार्याध्यक्ष पवनभाऊ महल्ले, शोभायात्रा प्रमुख पंकजभाऊ जायले, समितीचे सचिव चंद्रकांत झटाले इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत अखंड ज्योत पेटवून व ध्वजपूजन करून वैचारिक शिवसप्ताहाची सुरुवात करण्यात आली.