पुन्हा चलेजाव चळवळ

24

आपल्याला स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते स्वातंत्र्य सैनिक लोकनेते. विविध आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन बंद आत्मदहन. असे विविध. आपले रतनापेक्षा महत्वाचे अनमोल व्यक्ति आपण गमावले
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला गुलामगिरीतून मुक्ति मिळाली आणि आपण स्वातंत्र्य मिळाल्याने मोकळा श्वास घेतला त्यानंतर अनेक सत्तेची लालसा असणारे पक्ष नेते तयार झाले प्रत्येकजण आपापल्या परीने समाजातील विविध घटकांना बसवायला सुरुवात झाली समाजात अनेक प्रकारचे गट‌‌‌ असतात धार्मिक. वांशिक. भाषिक अशा स्वरूपात त्याचे अस्तित्व असते यातील काही काही गट कमी जादा प्रमाणात असत सामुहिक शक्ती. संख्याबळ. गुंडगिरी. पक्ष शक्ति. त्यातच पेरणी झाली ती म्हणजे जाती वर्गाचे अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती असे वर्गीकरण करून समाजात कायम स्वरुपी दरी निर्माण करण्याचे काम विविध राजकीय पक्ष नेते यांनी केले.

‌‌समतेचा हक्क. स्वातंत्र्याचा हक्क. शोषणाविरुद्ध हक्क. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. शैक्षणिक स्वातंत्र्याचा हक्क. सवैधानिक उपाययोजना हक्क. समतेचा हक्क. वैयक्तिक स्वातंत्र्य हक्क. सुसंस्कृत जीवनाचा हक्क. राजकीय हक्क. जाणता विवेकी व्यक्ती हा लोकशाहीचा आधारस्तंभ माणला जातो परंतु अशा व्यक्ती साठी समाजांत त्यासाठी अनुकूल वातावरण असणे गरजेचे असते तसे वातावरण निर्माण होत नाही आणि समाजात पोकळी निर्माण होण्यास सुरुवात होते.आपल्या हक्कांवर प्रामुख्याने तीन बाजूंनी आक्रमण होत असते केंद्र सरकारने. राज्य शासनाकडून. अन्य सामाजिक संस्था कडून. पक्ष नेते. विविध सत्ताधारी पक्ष. अन्य सामाजिक संस्था किंवा व्यक्ती कडून होणा-या आक्रमणा विषयी शासनाने केलेलें कायदे नियम याचा सर्वसामान्य माणसाला आधारच लागत नाही असे आक्रमणं आक्रमण केवळ निरंकुश राजसततेत किंवा हुकूमशाहीतच होत असते तर लोकशाही असताना सुध्दा राज्यात देशात गावात तालुक्यांत जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

आज आपण बघतो विविध प्रश्न न्याय हक्कासाठी विविध समाज धर्म आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन करत आहेत यात आपल्या हक्कावर तीनी बाजूने कसा रोख लावला जातो ते पहा आंदोलन करणार यावर गुन्हे दाखल करणे वेळ पडल्यास बळाचा वापर करून यांचें आंदोलन मोडीत काढणे. विद्यार्थी फी सवलत शाळांकडून घेण्यात येणारे डोनेशन विरोधात शिक्षण गोरगरीब तरूणांसाठी करण्यात आलेले शिक्षण विरोधी कायदे याबाबत आंदोलन करतात पण गुन्हे दाखल होऊन शालेय करिअर खराब करण्याची भिती घालून मोडीत आंदोलन होते असाच प्रकार आहे शेतकरी आंदोलन. कुणी उपाशी मेले तरी कोण विचारत सुध्दा नाही कामगार कल्याणकारी योजनांसाठी बोगस कामगार नोंदणी साठी अधिकारी व कर्मचारी यांचेकडून होणारा नाहक त्रास मालक ठेकेदार कामठिकाणी सेवा सुविधा. महिलांना कामावर असताना मिळणारी वागणूक. यासाठी कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करतो एखादा कामगार हितचिंतक उपोषणाला बसतो त्याला पोलिस संरक्षण वैद्यकीय साधने मिळत नाहीत ज्या अधिकारी व कर्मचारी यांचे मुळे झालेल्या अन्यायाविरुद्ध उपोषण करतो त्या अधिकारी व कर्मचारी यांना नामांकित व्यक्तीच्या वाढदिवसाला जायला वेळ आहे पण उपोषण करतयाला भेटण्यास वेळ नाही.

आपलेच बॅंक मध्ये असणारे पैसे काढण्यासाठी उन्हात उभे राहावे लागते गॅस सिलिंडर. डिझेल पेट्रोल. राॅकेल. रेशन कार्ड घोटाळा. रेशन अन्न धान्य घोटाळा. कागदपत्रांची कालमर्यादा पायमल्ली होते ग्रामपंचायत क्षेत्रात. नगरपरिषद. पंचायत समिती जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग रस्ता गटर समाजमंदिर पाण्याची टाकी दिवाबत्ती. वाहनांचे कर विविध फायनान्स कंपन्या बेनामी वसूली. दवाखाने. सरकारी खाजगी. मेडिकल कॉलेज जिल्हा परिषद शाळा. विविध टेंडर बाजार समिती नावांवर लूट व्यापारी यांचेकडून ग्राहकांची फसवणूक. वेळोवेळी वाढणारी महागाई आपण म्हणतो आम्ही आम्हाला स्वातंत्र्य मिळाले वरिल प्रमाणे सर्व विषय पाहता आज आपणास वाईट अनुभव येत आहेत कोणीही सर्वसामान्य जनतेचा विचार करत नाही आपल्या विविध हक्क व अधिकार यावर गदा आली आहे जातीच्या नावाखाली दंगे धोपे केले जातात निवडणूकीत जाती धर्माचे भांडवल केले जाते परवा एक मॅसेज आला.

१ ते ५० लाखांपर्यंत कर्ज उधोगासाठी देणेचा एक मॅसेज आहे पण त्यात अनुसूचित जाती जमाती व इतर विषेश मागासवर्गीय जाती जमाती भटक्या विमुक्त जाती यांना प्राधान्य आहे हे चुकीचा निर्णय आहे कारण ६० वर्षाचा पूरावा आपणाकडे मागितला जातो कोणाला माहित ६० वर्षांपूर्वी आमचें पूर्वज शाळेत गेले का नाही? कागद होता का ? पोट भरण्यासाठी फिरणारे शाळा कोठून शिकणार काही जणांनी वरिष्ठ अधिकारी यांना हाताशी धरून बोगस दाखले काढले आहेत ते मोठ्या व्यक्तिच्या जवळचे असतात पण गरिबांचे काय ? शाळेच्या दाखल्यावर असणारा जातींचा उल्लेख हा एकमेव पूरावा धरण्यात यावा.आपणास ८ ऑगस्ट १९४२ ला परकियांना हाकलून लावण्यासाठी चलेजाव चळवळ करावी लागली आज हा सर्व भ्रष्टाचार मनमानी कारभार नोकरी साठी राजकारण अशा अनेक असंख्य तक्रारी मागण्यासाठी. आत्ता आपल्यालाच हाकलून लावायची वेळ आली आहे विचार करा आणि निर्णय घ्या.

✒️लेखक:-अहमद नबीलाल मुंडे ९८९०८२५८५९
संस्थापक अध्यक्ष रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा