2018-19 या गळीत हंगामातील तोडणी आणि वाहतुकीची देयके साठी जागर गोंधळ आंदोलन

    39

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

    गंगाखेड(दि.16फेब्रुवारी):-शुगर्स लिमीटेड या कारखान्याने तोडणी आणि वाहतुकीची थकीत देयके तातडीने वितरित करावित, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गंगाखेड येथील तहसील कार्यालयासमोर बुधवारपासून जागर गोंधळ आंदोलन सुरू केले.
    गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्स या कारखन्याने 2018-19 या गळीत हंगामातील तोडणी आणि वाहतुकीची देयके वाहतुकदार व तोडणी मजुरांना वितरित केली नाहीत.

    सर्वसाधारणपणे त्या पोटी 13 कोटी 51 लाख रुपये एवढी रक्कम बाकी आहे.दरम्यान, या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने तातडीने मध्यस्थी करीत कारखान्याने ही बिले वितरित करण्याबाबत कारवाई करावी, अशी अपेक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्यासह भास्कर खटिंग, माऊली शिंदे, भगवान शिंदे, नागेश शिंदे, रावसाहेब मुळे, महादेव हरकळ, सीताराम गिराम, बाबासाहेब चव्हाण, पंढरीनाथ महात्मे आदींनी व्यक्त केली.