कुंटूर परीसरात अवकाळी पावसाने लावली हजेरी.

29

✒️चांदू आंबटवाड(नायगाव तालुका प्रतिनिधी)मो.9307896949

कुंटूर(दि.18फेब्रुवारी):-कुंटूर व परिसरात 17 फेब्रुवारीच्या मध्यरात्री मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने झोडपले.या बेमोसमी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

त्यात प्रामुख्याने हरभरा, टाळकी ज्वारी, गहू,व करडई ईत्यादी पिकांचे नुकसान झाले आसल्याची माहिती गावातीलच शेतकरी वामनराव पाटील चिंताके यांनी दिली.