अंबरनाथ येथील राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ ठाणे जिल्हा उपध्यक्ष श्री.भरत बहिरा यांना ठाणे जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

  35

  ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

  नाशिक(दि.18फेब्रुवारी):-महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक‌ सेवा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे व्दारा जिल्हा क्रीडा व युवा पुरस्कार वितरण दिनांक १७.०२.२०२१ स्थळ -काशिनाथ घाणेकर सभागृह,वसंत विहार ठाणे (प) करण्यात आले.युवक कल्याणात्मक तथा युवा
  क्षेत्रात भरीव कामगीरी बाबत जिल्हातील उत्कृष्ट युवक ,युवती व युवा संस्था या प्रदान करण्यात येतो २०१८-१९ व २०१९-२० युवा पुरस्कार वितरण करण्यात आले.

  मा.श्री एकनाथजी शिंदे(नगरविकास मंत्री तथा पालक मंत्री) यांचे हस्ते उत्कृष्ट युवक कामगीरी बाबत श्री.भरत पंढरीनाथ बहिरा( पर्यावरण रत्न पुरस्कार महाराष्ट्र शासन ) अंबरनाथ व श्री. अजित भालके शाहपुर युवती पुजा दिपक आवारे ठाणे यांना १०,००० रु.चा धनादेश सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले मंथन युवा प्रतिष्ठान वाशिंद व युवा संस्था महाराष्ट्र युवा संघ कोळीवली कल्याण यांना अध्यक्ष अजित बळीराम कारभारी(राज्य युवा पुरस्कार-महाराष्ट्र शासन) व सचिव नितीन कारभारी यांना रु. ५०,००० चा धनादेश सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र प्रादान करण्यात आले.

  प्रमुख उपस्थिती मान्यवर मा. श्री राजेश नार्वेकर भा.प्र.से. जिल्हाधिकारी ठाणे जिल्हा, मा. श्री विवेक फणसळकर भा.पो.से.पोलीस आयुक्त, ठाणे जिल्हा , मा. डॉ. सुरेश मेकला भा.प्र.से. ../एसीपी पोलीस सह आयुक्त ठाणे जिल्हा जिल्हा क्रिडा आधिकारी ठाणे सौ. स्नेहल साळूंके व क्रीडा अधिकारी जुबेर शेख, भक्ती आंब्रे, सुचिता धमके, मधुरा सिंहासने, श्री. बाबुल कर सर, श्री.पाटील सर युवा संकल्प प्रतिष्ठान अंबरनाथ सचिव नेहारिका बहिरा व सह खजिनदार दिशा गायकवाड उपस्थित होते.