मृगजळाचे बांधकाम

  33

  मानवीय मन हे उत्तुंग भरारी मारणारे असते.त्याचे चित्त एका ठिकाणावर करकचून बांधून ठेवता येत नाही.जीवनाच्या अग्नीशाळेत वावरताना असंख्य दाहकतेचे चटके शहण करावे लागते.मानवाला नवे उत्थानमूल्य पकडून नव्या बांधकामासाठी लागणारे सृजनशील औजार घेऊन नव्या जगाची निर्मिती करावी लागते.मानसाची बुध्दी अगम्य असून असीम तारांगणाच्या भवनभात क्रियान्वय सिध्दांताने नवे क्षितिज काबीज करावे लागते.वर्तमान व्यवस्थेतील मानवीय सभ्यतेला मुजोर खलग्रहाणी आपल्या फसव्या जाळ्यात कैद केल्याने नव्या मृगजळाचे बांधकाम करून वर्तमान जगाचा माणूस कप्पीबंद केला आहे.धार्मिक उन्मादाचा नव्या विषमज्वराचे भरघोस मेंदू तयार करून फँसिस्टवृत्तीने परिवर्तनाच्या साऱ्या वाटांना बंदिस्त करून टाकले आहे.जगातील साऱ्या मुलूखात मृगजळाच्या बांधकाम अवस्थातरण सुरू झाले आहे.विकसित व विकसनशीस देशात या मृगजळाने अंधाधुंद होऊन सैंवधानिक नीतीमूल्ये जाळत सुटला आहे.सत्तेचे राजकिय प्यादे मनयुक्तसंचारात राजकिय व सामाजिक व्यवस्थेची निर्मिती करत आहेत.

  मानव हा या सृष्टीतील सर्वांत चिंतनशील व बुध्दीमान प्राणी आहे.पर्यावरणीय संतुलन ठेवणारा पर्यावरणतंज्ञ आहे.नव्या ज्ञानचिकित्सक तत्वाचा शिल्पकार आहे.पण आज मानसाचे बीनडोक मेंदू तयार झाल्याने शरीर स्वतःचे पण मेंदू दुसऱ्याचा अशी गत मानव प्राण्याची झाली आहे.धर्माच्या , जातीच्या,भाषेच्या ,या विषमतामूलक कौर्यभरी मानसिकतेने मानवाचा मेंदू दंगलमय होत आहे.दंगली घडवून आणण्यासाठी या मेंदूचा खास उपयोग करून घेण्याचे प्रयोग देशात पूर्वीपासूनच सुरू आहेत.या खोगीरभर्ती अमाणूषतेतून वास्तवाच्या वर्तमानातून अवास्तविक असभ्य राजकिड्यांची भरघोस गर्दी वाढली आहे.सैंवधानिक नीतीमूल्याचे उच्चाटण करून प्राचीन असभ्यतेचे ढोल सातत्याने पिटल्या जात आहे.विकासाच्या नावाखाली जगाची खंडप्राय भागात विभागणी होत आहे.सारेच मदमस्त भांडवलदार कंपणीदार व राजदार गुलाम नावाचं जग तयार करत आहेत.जगातील सामान्य लोकांच्या क्रयशक्तीवर अमाप पैसा कमवून साऱ्या पृथ्वीला ओरबडून टाकले जात आहे.म्हणून आता साऱ्या विश्वाने नवे संविधान तयार करून विकृत मेंदूच्या अमानवीय विचाराला लॉकपमध्ये बंदिस्त करावं.सूर्यतेजाने अंधाऱ्या युगनिर्माणाऱ्यांना हिमालयधस्त करावं.

  आज भारतात नव्या अंधकारमय आभासी युगाची निर्मिती होत आहे.आम्ही सांगतो तेच खरे.आम्ही या जगावर राज्य करायला आलो आहोत.विश्वगुरू नावाची मोहणी करून वास्तव प्रश्नांना दाबल्या जात आहे.एकजात काही ब्रमँन संविधानानिष्ठ व्यवस्था समाप्त करत आहेत. मरूद्यानातील मृगजळाचे आमीश दाखवून भारतीय लोकांच्या मनात धर्मवादी विषारी रसायनं ओतल्या जात आहे.जवळचा मित्र,जवळचा प्रियकर धर्माच्या व जातीच्या चशम्यातून पाहला जात आहे.भक्तीरसाचा अमानवीय मळा भरून आला असून विषारीयुक्त फळाची नवी गोरीगोमटी जात लागल्याने अंधादुंध दंगलीचा भयकंप आवेग पसरला आहे.कौर्यसत्ता व करूणासत्ता यांच्या सौंदर्यसत्तेचे नवे वैचारिक महायुध्द् पेटले असून मानवाच्या सुंदर नात्याला वर्गवादाचा अंहकार वाढला आहे.

  मृगजळाचे हे बांधकाम भारतीय संविधानिक व्यवस्था जमीनदोस्त करत असून मूल्यसापेक्ष समाजव्यवस्था विकलांग बनत आहे.कौर्यसत्तेच्या अमानवीय व अनैसर्गिक भूमिकेमूळे करूणासत्तेची हानी होत आहे.पण नैसर्गिक सिध्दांतानुसार करूणासत्ता जगात नवसृजनत्वाचा आविष्कार करून मानवी सुंदर बाग तयार करते.काटेरी विषयुक्त पादपाला नष्ट करून हिरव्याकंच धरेला मायेची उब देऊ या.करूणासत्तेतून सौंदर्यसत्तेचे लोकशाहीकरण करून कौर्यसत्तेची मस्ती जिरवू या.नव्या वैचारिक मूल्यमंथनाचा नवा प्रबोधन मार्ग निवडून प्रतित्यसमुत्पादानुसार सर्वांचे कल्याण व्हावे.देशात होणाऱ्या सांमतशाही मृगजळाचे बांधकामावर सुरूंग पेरून बलशाली व बलदंड भारताची ध्वजा गगणात सदोदीत फडकावी हीच मनिच्छा ……तुर्ताश थांबतो..

  ✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००