सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षावर अविश्वास ठराव दाखल करणार

    32

    ✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    सोलापूर(दि.19फेब्रुवारी):-जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विरोधात मतदान केले म्हणून मोहिते पाटील गटाच्या सहा सदस्यांनी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारी विरोध सदर सदस्यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका गुरुवार दिनांक 18 फेब्रुवारी 20 21 रोजी सकाळी न्यायमूर्ती खानविलकर यांनी फेटाळून लावली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी माहिती दिली.

    सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यावर अविश्वास ठराव लवकरच दाखल करणार असल्याची माहिती बळीराम काका साठे यांनी प्रसार माध्यमांना दिली.