“अनलॉक” दिवाळी अंकास पुरस्कार

27

🔸४६ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक २०२० स्पर्धेचा निकाल घोषित

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.19फेब्रुवारी):- मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४६ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी घोषित केला आहे. यात नागपुरातून प्रकाशित झालेल्या इंक एन पेन पब्लिकेशनच्या ‘अनलॉक’ या दिवाळी अंकास वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक पुरस्कार घोषित झाला आहे.

पुरस्कार वितरण सोहळा येत्या दि. २७ फेब्रुवारी रोजी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन आणि मराठी भाषा दिवसानिमित्त काशिनाथ धुरू हॉल, दादर सार्वजनिक वाचनालय , मुंबई येथे सायंकाळी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या दिवाळी अंकाच्या प्रबंध संपादक रश्मी पदवाङ- मदनकर आहेत. संपादक आनंद आंबेकर असून अतिथी संपादक अभिनेते भारत गणेशपुरे आहेत.

या दिवाळी अंकात राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या लेखांचा समावेश आहे. ‘अनलॉक’चे हे पहिलेच वर्ष असून पदार्पणातच पुरस्कार प्राप्त झाला आहे. अनेक स्पर्धासाठीही ‘अनलॉक’चे नामांकन आहे.