मांडवा येथे शिवजयंती दिनी ग्राम परिवर्तन समिती पुनर्गठित

32

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.19फेब्रुवारी):- महाराष्ट्राचे आराध्य दैवत,कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ जयंतीदिनाचे औचित्य साधून मांडवा येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे शिवजयंती साजरी करून ग्राम परिवर्तन समिती पुनर्गठित करण्यात आली.

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे ग्रा.प .सदस्य गोपाल मंदाडे, ग्रा.पं. कार्यालय कर्मचारी प्रदुम्न आबाळे यांच्या हस्ते तसेच उपस्थितांनी पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी ओमप्रसाद घुक्से यांनी ग्रामपंचायत कार्यालयास छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली.त्यानंतर ग्राम परिवर्तन समितीच्या अध्यक्षपदासाठी योगेश बंडू पुलाते यांची निवड करण्यात आली.

तर उपाध्यक्ष म्हणून अंकुश घावस, कार्याध्यक्ष ओमप्रसाद घुक्से, सचिव महादेव माटे, कोषाध्यक्ष बाळू धाड, सल्लागार प्रवीण धाड, संघटक म्हणून सिद्धार्थ ढोले ,शरद साखरे ,पृथ्वीराज चव्हाण, रामदास वानखेडे ,उमेश पुलाते तर प्रसिद्धीप्रमुख बजरंग राठोड ,संदीप आबाळे ,प्रवीण घुक्से, राजेश घुक्से, तर सदस्य म्हणून रवि चवरे, बाळू आबाळे, बजरंग पुलाते, धम्मदीप ढोले, कार्तिक धाड ,अविनाश आबाळे, वैभव घुक्से, चिंतामण पुलाते, देविदास गजभार, गोपीनाथ साखरे, बाळु ढोले, लखन दाडे, राहुल सुरोशे , रवि लांडगे, इत्यादी यांची निवड करण्यात आली.