ओबीसी तर्फे जेष्ठ प्रबोधनकार शूरनर यांचा वाढदिवस साजरा

23

✒️शिवानंद पांचाळ(नायगाव प्रतिनिधी)मो:-९९६०७४८६८२

नायगाव(दि.19फेब्रुवारी):-ओबीसींचे जेष्ठ प्रबोधनकार व लेखक श्री गोविंदराम सखाराम शूरनर यांचा 67 सावा वाढदिवस मोठया थाटामाटात ओबीसी जनगणना वेल्फेयेर मिशन नांदेड तर्फे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी भूषण श्री रामचंद्र सावंत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध उद्योजक श्री बालाजीराव इबीतदार,श्री नामदेवराव आईलवाड, म न पा नांदेड चे माजी सभापती श्री नंदकुमार कोसबतवार,वंचित बहुजन नांदेड दक्षिणेच्या अध्यक्षा सौ देवशाला नामदेव पांचाळ, बारड चे श्री रामेश्वर गोडसे महाराज, जी प चे माजी अधीक्षक अभियंता श्री मिलिंदजी गायकवाड,शिंपी समाज नांदेड उत्तरचे अध्यक्ष श्री राजकुमार श्रीरामवार,श्री नागोराव शेंडगे,श्री वेंकटराव पार्डीकर,पिछडा शोषितचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री एस जी माचनवार,श्री के एच राठोड,श्री राजेश चिटकूलवार,श्री रवि बंड्रेवार सर,प्रा बलभीम मेथेले, डॉ एस के स्वामी,श्री रमेश सांगळे,भावसार समाज सिडको चे अध्यक्ष श्री पेटकर संजय,नाभिक समाजाचे दक्षिण अध्यक्ष श्री जयराम शिंदे,श्री संदीप जिल्ल्हेवाड आणि विवेकानंद हॉस्पिटल च्या संचालिका डॉ सौ.आशा w/o डॉ पांडुरंग विभूतवार,सौ.श्रद्धा बालाजीराव इबीतदार,सौ मदनेश्वरी देवकाते,बालाजी पांचाळ, डॉ सौ अनिता माळी,डॉ प्रकाश जोंधळे,चंद्रकला श्रीमंगले,लक्ष्मण मस्के,पिंटू शिकारे,परशुराम थिट्टे हे उपस्थित होते.

महापुरुषांच्या प्रतिमांना प्रथम पुष्पहार अर्पण करण्यात आले व उपस्थितांनी आदरणीय प्रबोधनकार श्री गोविंदराम सुरनर यांचे अभिष्टचिंतन केले.या प्रसंगी कंजारा ग्रामपंचायत ता. हदगाव मध्ये ओबीसी प्रवर्गातून निवडून आल्या बद्धल तरुण कार्यकर्ते श्री स्वप्नील रामगिरवार यांचाही भव्य सत्कार करण्यात आला,या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.सत्कारास उत्तर देतांना प्रबोधनकार शूरनर म्हणाले की नांदेड हे ओबीसी चळवळीचे केंद्र आहे सध्या ओबीसींच्या जनगणनेसाठी महाराष्ट्रभर मोर्चे व परिषदा होत आहेत नांदेड येथेही सर्व सक्रिय कार्यकर्त्यांनी मिळून मोठा मोर्चा काढावा किवां परिषद घ्यावी तोच माझा सत्कार असेल असे उदगार काढले व अभूतपूर्व कार्यक्रम व ओबीसींची मीटिंग घडवून आणणारे राजेश रापते यांना आशीर्वाद दिले.

यावेळी श्री स्वप्नील म्हणाले की प्रवाहाच्या विरोधात मी एकाही पैशाचे किंवा दारूचे वाटप केले नाही अशा सामान्य गरीब कार्यकर्त्यास निवडून दिल्याबद्धल व हा एवढा मोठा सत्कार केल्याबद्धल सर्वांचे आभार व्यक्त केले.ओबीसींच्या पुढील आंदोलनासाठी अजून एक फक्त ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा ठरवणे व नेतृत्व व मुख्य मार्गदर्शकांची निवड इत्यादी ठरवण्यासाठी मोर्चा विषयावर एक व्यापक मीटिंग घेऊन, प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थित ठरविण्यात येणार आहे.यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन आखणी करण्यावर सर्वांचे एकमत झाले.तरी लवकरच पुढील सभेचा मेसेज देऊ असे राजेश रापते यांनी घोषित केले,या सभेत त्यांच्यावर समन्वयकाची जवाबदारी देण्यात आली