जिल्हा माहिती अधिकारी व ग्रामीण लोककला विकास मंडळाच्यावतीने सात गावात जनजागृती कार्यक्रम संपन्न

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतींनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.19फेब्रुवारी):- कोरोना महामारी आजाराविषयी जन माणसात जनजागृती व्हावे यासाठी महाराष्ट्र शासन जन संपर्क महासंचालनालयाच्या वतीने जनजागरण अभियान राबवितांना सेवाभावी संस्था अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील सात गावामध्ये ग्रामीण लोककला विकास मंडळाने जन जागरणामद्धे कोरोना लसीकरण व नदी प्रदूषण नियंत्रण अभियानामध्ये प्रत्येक गावात जन जागरण केले असल्याचे मंडळाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ अभियानामध्ये कोरोना विषयी जन जागृती करतांना स्वछ्तेचे महत्व सांगत सुरक्षित अंतर ठेवतांनाच मास्क चा वापर अनिवार्य असल्याचे पथनाट्यमध्ये नाट्यशैली मध्ये लोकांना हसवून लोककलाद्वारे सादरीकरण करत अजूनही लोकांनी जागरत राहतांना खबरदारी घेतली पाहिजे.

या लोककला पथकामध्ये आजपर्यंत गंगाखेड, पिंपळदारी, दामपुरी, रणीसावरगाव, बोर्डा, सेलमोहा, वागदारी आदि गावात ध्वनिक्षेपकचा आधार घेत जन जागरण केले आहे. या लोक कला पथकामध्ये शाहीर सुभाष साबळे, गायिका जयमाला कांबळे, नाट्य कलावंत राहुल साबने ढोलकी वादक नारायण जलाले, पेटी वादक गणेश कांबळे, संपत वाघमारे, सुग्रीव पैठणे, शिवानंद तोडकरे, रमेश पैठणे, प्रवीण पैठणे इत्यादींनी सहभाग घेतला होता.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED