युवक मराठामहासंघ अकोला महानगर कार्यकारिणी जाहीर

25

🔹विपुल माने महानगर अध्यक्षपदी फेरनियुक्त

✒️अकोला(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अकोला(दि.20फेब्रुवारी):-अखिल भारतीय मराठा महासंघ अकोला जिल्हा अंतर्गत महानगरातील युवक कार्यकर्त्यांची बैठक नेहरू पार्क याठिकाणी पार पडली.महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष श्री कृष्णाभाऊ अंधारे हे होते.यावेळी संपर्क प्रमुख योगेश थोरात, प्रा. अल्केश खेंडकर, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष मनोज घाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. उर्वरित कार्यकारिणीत सरचिटणीसपदी निखिल पुरी, अविनाश देशमुख कोषाध्यक्ष पदी, संघटक म्हणुन अभिजीत देशमुख, तर गौरव केळकर, स्वप्नील थोरात, अक्षय पवार, आकाश देशमुख यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

विभागीय अध्यक्ष म्हणुन निलेश नवले (अकोला पूर्व विभाग), शुभम गायकवाड (पश्चिम विभाग), चेतन पवार (उत्तर विभाग), आकाश शिंदे (दक्षिण विभाग), प्रतीक खराडे (मध्य विभाग ) नियुक्त करण्यात आले. रोहीत देशमुख सोशल मीडिया प्रमुख, तर आशिष नवले संपर्क प्रमुख म्हणुन नियुक्त करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ह्या सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन योगेश थोरात यांनी तर आभार प्रदर्शन स्वप्नील थोरात यांनी केले. यावेळी दिपक मेहरे, वैभव उंबरकर, शाम सोनटक्के, अनिकेत गवई, राजदीप पट्टेबहादूर, सागर नाईकवाडे, गौरव घोलपकार, नाना देशमुख, प्रणव शिंदे, विशाल ईचे आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.