जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर शाळेत शिवजयंती साजरी

    47

    ✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

    कुंटुर(दि.19फेब्रुवारी);-जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर येथे आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मोहनराव होळकर , श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बालाजी पवार व नागोराव सोमठाणे सर यांच्या हस्ते झाले.

    याप्रसंगी उपस्थित सर्वांनी पुष्पांजली अर्पण केली. शाळेचे मुख्याध्यापक एस.बी.राजपूत,बी.एम.बावणे,आर.एल.नेहरु ,सौ.जी.एस.शिनगिरे,सौ.एम.एम.चाटोरे तसेच एस.जी.स्वामी सर, पत्रकार चांदु आंबटवाड,शुभम बावणे,चौधरी,कार्तिक अडकिणे,जनार्दन इबितवार,जयेश चाटोरे यांची उपस्थिती होती.