जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईकळीमाळ येथे शिवजयंती उत्साहात साजरी

    32

    ✒️चांदू आंबटवाड(नायगाव तालुका प्रतिनिधी)मो.9307896949

    कुंटूर(19फेब्रुवारी)नायगाव तालुक्यातील मौजे ईकळीमाळ येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती यांची जयंती साजरी करण्यात आली.

    या वेळेस महाराजांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक श्री नागोरावजी सोमठाने सर यांच्या हस्ते पुजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी ईकळीमाळ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य मा.गंगाधर सुर्यवंशी यांच्या सह पत्रकार व गावकरी मंडळी हजरळ होते.