परळी पंचायत समिती उपसभापती जानीमिया कुरेशी यांनी आपल्या उपसभापती पदाचा पदभार स्विकारला

    38

    ✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

    परळी(दि.20फेब्रुवारी):- पंचायत समिती उपसभापतीपदी नुकतीच सिरसाळा प.स.सदस्य जानीमिया कुरेशी यांची निवड झाली.राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंञी ना.धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आज आपल्या उपसभापती पदाचा पदभार घेतला आहे.यावेळी पदभार स्विकारतांना प.स.सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे,माऊली मुंडे,सटवाजी फड,मोहन सोळंके,वसंत तिडके,सुदाम शिंदे अदी पदाधिकारी उपस्थित होते.

    पदभार स्विकारल्या नंतर पंचायत समिती सदस्य व पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतिने उपसभापती जानीमिया कुरेशी यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे व त्यांच्या स्टाफच्या वतिने सत्कार करण्यात आला.

    आज सकाळी उपसभापती जानीमिया कुरेशी यांनी जगमिञ कार्यालयात राज्याचे सामाजिक न्याय व विशेषसाह्य तसेच जिल्हयाचे पालकमंत्री ना धनंजयजी मुंडे साहेबांची भेट घेतली यावेळी ना.मुंडेंनी जानीमिया कुरेशी यांचा सत्कार केला.यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, नगरसेवक शरद मुंडे, यांच्या सह अनकेजण उपस्थित होते.