खान्देश कुंबी मराठा समाजाच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम

  34

  ✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

  चाळीसगाव(दि.20फेब्रुवारी):- येथील खान्देश कुंबी मराठा समाजाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पाटणा देवी येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज या थोर पुरुषांच्या जयंती निमित्त तालुक्यातील पाटणादेवी येथे दिनांक 14 रोजी सकाळी 11 वाजता निसर्गरम्य वातावरणात हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला.

  यावेळी ह.भ.प. कृष्णा महाराज यांच्या ज्ञानदान प्रवाचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज आणि जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा समाजमार्फ साजरा करण्यात येणारे हे स्नेह समलेन भेटी गाठी साठी एक निमित्त असून खऱ्या अर्थाने हा समाज एकोपासाठी उत्तम उदाहरण आहे.

  असे समाजपयोगी विविध प्रकारचे कार्यक्रम समाजाने नेहमी राबविले तर येणारी आपली पुढील पिढी यापासून निश्चितच चांगले बोध घेतल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन कृष्णा महाराज यांनी आपल्या ज्ञानदानातून मनोगत व्यक्त केल्या. या कार्यक्रमात काव्या योगेश गायकवाड या पाच वर्षीय चिमुकलीने शिवाजी महाराजांच्या नावाचा अर्थ समजवून सांगून महाराजांच्या कार्याविषयी माहिती व त्यांचे महत्व सांगितले व उपस्थित समाज बांधवांचे मने जिंकली आणि काही बक्षीसही मिळवली. कार्यक्रम प्रसंगी शिक्षक सुनील पाटील यांनी एक भजन म्हणून उपस्थितांना मंत्रोमग्न केले होते.

  यावेळी उपस्थित समाज बांधवांना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी खान्देश कुंबी मराठा समाजाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, मोनाली क्लासेचे अध्यक्ष नाना पाटील, सचिन पाटील, ईश्वर पवार, संदीप जाधव, प्रदीप मराठे, रणधीर जाधव, संदीप घोरपडे, धनंजय घायवट, सचिन गायकवाड, छोटू पाटील, योगेश पाटील, सुधीर पाटील, बंडू पाटील यांनी परिश्रम घेतले यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन विध्यार्थीनी युक्ता केशव पाटील यांनी केले तर आभार नाना पाटील सर यांनी मानले.