हाणेगाव येथील पोलिस चौकीचे वय झाले किमान दीडशे ते दोनशे वर्ष

87

🔸इमारतीची दुरवस्था ऐकून आ. अंतापुरकर यांनी डी.पी.टी.सी मधुन एक कोटी रुपयाचा निधी देण्याचा दिला होकार

✒️देगलूर प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो.न९४०४६४२४१७

हनेगाव(दि.21फेब्रुवारी):-येथील पोलिस चौकीही निजाम कालीन असून याचे किमान दीडशे ते दोनशे वर्ष झाले असून या ठिकाणी काम करणारे पोलीस कर्मचारी आपले जीव मुठीत धरुन काम करतात इंग्रजाच्या काळात इथे पोलीस स्टेशन कार्यरत होते पण नंतरच्या काळात काही कारणास्तव या ठिकाणचे पोलीस स्टेशन येथे हलविण्यात आले हे विभाग पूर्वीपासूनच मोठे असताना या पोलीस स्टेशनची बढती होण्याऐवजी या ठिकाणचे पोलीस स्टेशन हलवून येथे चौकी देण्यात आली ही इमारत निजामकालीन असून या इमारतीच्या बांधकामाला किमान दीडशे ते दोनशे वर्ष झाले असून याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

ही इमारत खंडर सारखी आणि खूळखुळ झालेली आहे येथील कर्मचारी दिवसभर रात्री-बेरात्री सेवा बजावून थोडीशी विश्रांती व उसंत घेण्यासाठी येतात पण त्यांना या ठिकाणी आपले जीव मुठीत धरून आपले काम करावे लागते देगलूर तालुक्यातील सर्वात मोठे सर्कल म्हणून ओळख असून या कारणाने अनेक कामासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना उदाहरणात गणेश उत्सव आंबेडकर जयंती शिवाजी महाराज जयंती उत्सव रमजान ईद अण्णाभाऊ साठे जयंती विविध निवडणुकीसाठी सतत सतत या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी यावे लागते पण या ठिकाणची दयनीय अवस्था पाहून अनेक जण थक्क होतात अनेक दिवसापासून पडीत अवस्थेत असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी व बांधकामाविषयी मरखेल पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्याकडे अनेक कार्यकर्त्यांची मागणी असून त्यांच्याकडून ही अपेक्षा पूर्ण होईल असे वाटते.

तसेच स्थानिक आमदार साहेब, तसेच लोकप्रतिनिधी यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्यास याठिकाणी सुसज्ज चौकी निर्माण होईल. व काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस तात्काळ उपलब्ध होऊ शकतात. तसेच गुन्हेगारी चे प्रमाण कमी होऊ शकते. पोलिसांची रहदारी वाढू शकते. त्यामुळे चौकीचे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चव्हाण साहेब हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असल्यामुळे त्यांनी लक्ष घातल्यास निधी तात्काळ मिळू शकतो.