विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कोंढार भागातील नूतन संचालक यांचा सन्मान

30

🔸शिवजयंती उत्साहात साजरी

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.21फेब्रुवारी):-चांदज ता. माढा येथे जिल्हा परिषद सदस्या अंजनादेवी शिवाजीराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच कोंढार भागातील नुतन संचालक मा. वेताळ जाधव, औदुंबर घाडगे, सचिन देशमुख यांचा सत्कार शिवाजीराव पाटील व बळीराम हेगडकर यांनी केला. तसेच माढा तालुका पञकार संघाच्या उपाध्यक्षपदी सतीश काळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार तानाजी गाडे यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार बबनदादा शिंदे व रणजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखाना बिनविरोध झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन शिवाजीराव पाटील, सर्व सभासद व ग्रामस्थांनी स्वागत केले.

यावेळी कारखान्याचे ऊस विकास अधिकारी श्री. लगड साहेब यांनी ऊस नियोजन करून उत्पादन कसे वाढवायचे हे सांगितले. यावेळी राजमाने चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य दत्तु माने, यशवंत लठ्ठे, बाळासाहेब चंदनकर, हनुमंत पाटील, बाबुराव हेगडकर, अजिनाथ तांबवे, पोलीस पाटील जालिंदर पाटील, ॲड. कुलदीप पाटील, आप्पा पाटील, संतोष चव्हाण, प्रताप रुपनवर, तात्यासो गाडे, संभाजी गुरव, बापू हेगडकर, अनिल मचाले, तात्यासाहेब रुपनवर, पोपट भोई, गणेश मच्छिंद्र पाटील, रजनीकांत माने, सचिन भोई, नवनाथ चव्हाण व रांझणी गटातील सर्व कारखान्याचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.