शिवजन्मोत्सव व वाढदिवसानिमित्त आरोग्य केंद्रास डस्टबिन भेट

32

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.21फेब्रुवारी):- तालुक्यातील कुंडलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रभाग क्रमांक सात च्या नगरसेविका शकुंतलाबाई गंगाधरराव खेळगे यांचे सुपुत्र प्रदीप खेळगे यांनी शिवजयंती व वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्रास डस्टबिन भेट दिली आहे.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी सातमवाड,डॉ. विनोद माहुरे,डॉ.नरेश बोधनकर,प्रा.अरविंद बोधनकर, संतोष चव्हाण,प्रदीप रत्नागिरे, गजानन येपूरवार, व्यंकट खराडे, नागराज तुंगेनवार,नागनाथ कोलंबरे,आरोग्य केंद्राचे कर्मचारी एस.डी.सावंत, देवकांबळे,पडलवार,श्रीकांत अमेटवार,सी.एन.जाधव,मुंढे आदी उपस्थित होते.

प्रदीप खेळगे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.आरोग्य केंद्रास डस्टबिन भेट दिल्याने डॉ.बालाजी सातमवाड यांनी खेळगे परीवाराचे आभार मानले आहे.