आरोपीचा पाठलाग करून दारूसाठा जप्त

27

🔺ब्रह्मपुरी पोलिसांची कारवाई मुद्देमालासह दोन लाख सत्तर हजाराचा माल जप्त

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.22फेब्रुवारी) :-आज दिनांक 20 ला मिळालेल्या गुप्त जन माहितीच्या आधारे सोनेगाव नदीघाट रोडवर नाका-बंदी दरम्यान आरोपीचा पाठलाग करून मारुती अल्टो क्रमांक एम एच 31 ए. एच. 2298 गाडीची झडती घेतली असता कारमध्ये तीन खड्ड्याच्या बॉक्समध्ये व दोन चुंगडी मध्ये 700 नग देशी दारू तसेच 90 एम एल भरलेल्या प्लास्टिकचा सीलबंद निपा असलेल्या किंमत 70 हजार रुपयाची देशी दारू व वाहतुकीकरिता वापरलेली निळ्या रंगाची मारुती अल्टो कार किंमत दोन लाख रुपये असा एकूण दोन लाख सत्तर हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला.

आरोपी प्रेमदास उर्फ हेमराज किसन अवसरे वय 29 वर्ष रा.सोनेगाव, मारुती हिरामण अवसरे वय 35 सोनेगाव ,गाडी चालक,फरीद उर्फ शेरु शफी शेख वय 28 वाडसा जिल्हा गडचिरोली यांना ताब्यात घेतले असून आरोपी आकाश सिडाम राहणार वडसा जिल्हा गडचिरोली हा आरोपी फरार आहे.

सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे कलम 65( अ)83 मदाका अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनात व पोलिस निरिक्षक मल्लीकार्जुन इंगळे यांच्या आदेशान्वये नापोका मुकेश गजबे,पोलीस अंमलदार अमोल गिरडकर, विजय मैंद, अजय कटाईत ,संदेश देवगडे, योगेश शिवणकर यांनी केलेली आहे.