खुतमापूर येथील सरपंचासह चार जणांचे सदस्यत्व रद्द

33

🔹जात वैद्यता प्रमाणपत्राचा अभाव

✒️हणेगाव प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.22फेब्रुवारी):- तालुक्यातील खुतमापूर येथील ग्रामपंचायत येथील सत्तेमध्ये असलेले चार व विरोधी पक्षातील एक असे पाच सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचे जिल्हाधिका-यांचे पत्र आल्याने खुतमापूर गावात व आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अॉक्टोंबर २०१८ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक होऊन त्यामध्ये ग्रामविकास पॕनलचे( बालाजी ईंगले यांचे ) सहा तर विकास परीवर्तन पॕनलचे तिन उमेदवार निवडून आले .यामध्ये ग्रामविकास पॕनलचे सहा उमेदवार निवडून आल्यामुळे व सरपंच पद हे एस टी महिला प्रवर्गास सुटल्यामुळे सरपंच पदाचे दावेदार म्हणून सौ.ज्योती अनिल वलकले यांना पहिली पसंती देऊन सरपंच पदावर विराजमान करण्यात आले.परंतु निवडणूक झाल्यानंतर १२ महिन्याच्या आत जात वैद्यताप्रमाणपत्र संबंधित विभागाला सादर करावयाचे होते.

पण यामध्ये एस टि प्रवर्गातील १) सौ.ज्योती अनिल वलकले,२)अनिल धोंडिबा वलकले,३) सौ.सुलोचना गणपत वलकले तर ओ.बी.सी.प्रवर्गातील १) रामदास बळीराम ठावरे ,२)सौ.शेषाबाई मारोती चोपडे या सदस्यानी जात वैद्यता केली नाही म्हणून विरोधी गटाचे (विकास परिवर्तन पॕनलचे) सदस्य प्रशांत सुर्यकांत कांबळे यांनी दि.२९/७/२०२० रोजी या पाच सदस्याच्या विरोधात न्यायालयात याचीका दाखल केली व त्याची पडताळणी होऊन निवडणूक आलेल्या सदस्यानी वेळेच्या आत जत वैद्यता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे दि.१६/२/२०२१ रोजी खुतमापूर येथील पाच सदस्याचे निलंबन करण्यात आल्याचे पत्र नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी अधिनियम १९५८ चे कलम १०(१) अ अन्वये सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे संबधित विभागास कळविण्यात आले.

यावेळी खुतमापूर येथील सरपंच पती अनिल धोंडिबा वलकले यांना फोनवर संपर्क साधले असता,आम्ही यापुढील कार्यवाही औरंगाबाद हायकोर्टात याचीका दाखल करणार असल्याचे सांगितले.पण या प्रकारामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेले आहे.