मौजा पारडंगाव शिव जन्मोत्सव समिती द्वारे वृक्षारोपण

24

🔹100 झाडे वृक्षदान करण्यात आले

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.22फेब्रुवारी):- आज 21 फेब्रुवारीला मौजा पारडंगाव येथे शिव प्रेरणा घेऊन शिव जन्मोत्सव समिती द्वारे पृथ्वी मातेला वृक्षदान करण्यात आले. सध्याची परिस्थिती लक्षात घेता 100 झाडे वृक्षदान करण्यात आले. पर्यावरण वादी व सेंद्रिय शेती कार्यकर्ता सुधीर ठेंगरी यांनी पुढाकार घेऊन आपली कल्पना गावकरी मंडळी सोबत व्यक्त केली व गावातील तरुण बांधवांनी लगेच अमलात आणली.

प्रत्येक हजर व्यक्तीला एक एक झाड देऊन वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला वनरक्षक सोनाली सुधीर ठेंगरें यांची मोलाची कामगिरी बजावली व आपल्या अनुभवातून वृक्षारोपण ला मार्गदर्शन केले. सोबत शिक्षक नीलकंठ ठेंगरी,एमएससीबी कर्मचारी विजय दिवठे, आंगांवडी सेविका ठेंगरी ताई, कृशिमित्र राजू ढोरे, रोजगार सेवक मनीष गिरी व शिव जन्मोत्सव समिती चे सभासद मंडळी उपस्थित होते