सारंग दाभेकर यांची अन्यायग्रस्त रोजंदारी कामगारांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला भेट

31

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.22फेब्रुवारी):-नगर परिषद चिमूर येथिल अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या अत्यंत महत्वाच्या रोजंदारी कामगारांना वेतन वाढ मिळावी, कामगार किमान वेतन अधिनियमा प्रमाणे वेतन मिळावे तसेच शासन निर्णया प्रमाणे विशेष भत्ता मिळावा याकरिता बेमुदत काम बंद आंदोलनास व्यापारी मंडळ चिमूर चे अध्यक्ष *प्रकाश जी बोकारे ,* सचिव *सारंग दाभेकर,* सहसचिव *पप्पु उर्फ शकील शेख* व *माजी नगर सेवक कदिर शेख* यांनी भेट दिली.

सारंग दाभेकर यांनी नगर परिषदेच्या अन्यायग्रस्त रोजंदारी कामगारांकडून माहिती जाणून घेतल्यानंतर लगेच माहिती अधिकार अधिनियम 2005 नियम 4 (ब) नुसार आंदोलना संबधित रेकॉर्ड प्रत्यक्ष तपासणी करिता अर्ज नगर परिषदे ला दिला व तात्काळ नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यासी चर्चा करून रोजंदारी कामगारांची उपरोक्त समस्या लवकरच निकाली काढण्यात येईल असे आंदोलन कर्त्यांंना आश्वासन दिले.