नाशिक शहरात विना माक्स एक हजार रुपये दंड व या काळात संचारबंदी लागू

24

🔹जिल्हाधिकारी श्री मांढरे यांची माहिती

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नासिक(दि.22फेब्रुवारी):- कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रात्री अकरा वाजेपासून ते सकाळी पाच वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येत आहे तसेच सर्वांना मास्क वापर करणे बंधनकारक असून मास चा वापर न केल्यास एक हजार रुपये दंड करण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

रूग्णाची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात covid-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भुजबळ फार्म येथे आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री भुजबळ बोलत होते या बैठकीस जिल्हाधिकारी सुरज मांढरे महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव पोलीस आयुक्त दीपक पांडे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रत्न खडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिर आहेर निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत खैरे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे निवासी उपजिल्हाधिकारी ना भागवत डोईफोडे जिल्हा रुग्णालय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद पवार महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अवेश पलोड हे उपस्थित होते ‘ जिल्हाधिकारी म्हणाले की ‘ जिल्ह्यातील करुणा ची सद्यस्थिती माहिती देताना जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले की गेल्या चार पाच दिवसात जिल्ह्यात पॉझिटिव रुग्णांची संख्या वाढत आहे 16 फेब्रुवारी ते 20 या पाच दिवसात शहरात चारशे दहा ग्रामीण भागात 77 आणि मालेगाव येथे 41 असे एकूण 534 रुग्णांची वाढ झाली आहे सध्या जिल्ह्याच्या मृत्यु दर स्थिर असला तरी पंधरा दिवसात सतराशे एकतीस रुग्ण वाढणे हे सर्वांसाठी धोकादायक आहे.

तसेच एकूण रुग्णाच्या 80 ते 90 टक्के रुग्ण गृह विलगीकरनात असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले ग्रामीण भागाचा विचार करता निफाड दिंडोरी तालुक्यात संख्या वाढत आहे यासाठी सामाजिक कार्यक्रमावर निर्बंध आणून गर्दीची वाढते प्रमाण नियंत्रणात आणण्याची जिल्हा प्रशासनामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी पालकमंत्री यांना दिली.