माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायती आमच्याच राष्ट्रवादी व भाजपाचा दावा

36

🔸लोकांमध्ये संभ्रम,नेतेही बुचकळ्यात

🔹इंदापूर पॅटर्न राबविण्याची मागणी

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

माळशिरस(दि.23फेब्रुवारी):- तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक सण 20- 21 ते 24- 25 या वर्षासाठी निवडणूक झालेल्या होती त्यावेळी माळशिरस तालुक्यातील प्रबळ असणारे पक्ष भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या मध्ये रस्सीखेच लागलेली होती. भारतीय जनता पार्टी कडून 41 ग्रामपंचायतीवर वर्चस्व तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून 24 ग्रामपंचायतीवर वर्चस्व असे सोशल मीडियावर भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये रस्सीखेच लागलेली होती.

इतर पक्ष्यांची सुद्धा कुजबूज होती, मात्र दबक्या आवाजात होती. उद्या मंगळवार दिनांक 23 फेब्रुवारी 20 21 रोजी सरपंच पदाचे निवडी माळशिरस तालुक्यात असल्याने सरपंचांनी सांगावे आपण कोणत्या पक्षाचे राष्ट्रवादी का भाजप किंवा अन्य पक्षाचे असे राजकीय वर्तुळामध्ये चर्चिले जात आहे.

इंदापूर तालुका याठिकाणीही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये ग्रामपंचायती पेक्षा दोन्ही पक्षाचा दावा केलेले ग्रामपंचायतीचे सरपंच ज्यादा होत होते त्यावेळी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीने सरपंचांचा सत्कार घेऊन भाजपला तोंडावर पडलेले होते. तसाच इंदापूर पॅटर्न माळशिरस तालुक्यामध्ये सरपंच निवडीनंतर राबवावा असेही बोलले जात आहे. माळशिरस तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत मात्र 65 ग्रामपंचायतीची बेरीज दोन्ही पक्षाने लावलेली आहे. त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल त्यामुळे माळशिरस तालुक्यात भाजप का राष्ट्रवादी चे नेते व कार्यकर्ते यामधील दावा करणारे खरे कोण आणि खोटे कोण असे माळशिरस तालुक्यातील जनतेसमोर येईल त्यामुळे माळशिरस तालुक्यात इंदापूर पॅटर्न राबवावा असे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.