मांडवा ग्रामपंचायत सरपंच पदी अलका रमेश ढोले तर उपसरपंचपदी विजय फुलसींग राठोड यांची अविरोध निवड

25

✒️बाळासाहेब  ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.22फेब्रुवारी):- तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायत सदस्यांची अविरोध निवड झाल्यानंतर सरपंच ,उपसरपंच पदासाठी झालेली निवडणूक अविरोध झाली आहे.
सरपंच पदी अल्का रमेश ढोले तर उपसरपंच पदी विजय फुलसिंग राठोड यांची अविरोध करण्यात आली.
मांडवा येथील ग्रामपंचायत ९ सदस्यांची आहे . यावेळेस ८० टक्के महिलांना ग्रामपंचायतीमध्ये प्राधान्य मिळाले आहे.

यामध्ये (सरपंच)अलका रमेश ढोले, (उपसरपंच)विजय फुलसींग राठोड, संगीता देविदास गजभार, शालिनी हरिभाऊ धाड,
कमल कैलास राठोड, कविता विठ्ठल आडे, गोपाल अरुण मंदाडे, जयश्री गजानन आबाळे, आरती बाळू पुलाते हे अविरोध सदस्य म्हणून निवडून आले होते.आज सरपंच उपसरपंच पदासाठी झालेली निवडणूक अविरोध झाली.

अध्यासी अधिकारी म्हणून सुनील अर्जुन गजभे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामसेवक मंगेश देशमुख, पोलीस पाटील दत्तराव पुलाते, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यांनी नवनिर्वाचित सरपंच अलका रमेश ढोले व उपसरपंच विजय फुलसींग राठोड व ग्रामपंचायत सदस्यांना शुभेच्छा दिल्या .

नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच आणि सदस्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक , समस्त गावकऱ्यांचे आभार मानले.