महासंघ साहित्यिक आघाडी राज्य सह प्रसिद्धी प्रमुख पदी अंगद दराडे यांची नियुक्ती

    41

    ✒️बीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    बीड(दि.23फेब्रुवारी):-सामाजिक तसेच साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करत असलेली, वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संस्थेची महासंघ साहित्यीक आघाडीची नुकतीच कार्यकारणी घोषित करण्यात आली असून यामध्ये बीड येथील नवद्दीत कवी लेखक अंगद दराडे रा. घळाटवाडी ता माजलगाव, यांची राज्य सहप्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे, ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे यांच्या मार्गदर्शनानुसार महासंघ साहित्यिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष डॉ अनिल सांगळे यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

    या नियुक्तीबद्दल महासंघातील पदाधिकारी खंडेश्वर मुंडे,रुपेश घंबरे रामराव केंद्रे छबू कांगणे, यांनसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या, अंगद दराडे हे मुळात ग्रामीण भागातील नवदित कवी अगदी अल्प वयात साहित्य क्षेत्रात ची आवड,पण अनेक अडचणी,मात्र त्यांच्या साहित्य प्रवासाला महाराष्ट्रातील अनेक व्रतपत्राचा मोलाचा वाटा लाभलेला आहे,सामाजिक विषयावर तसेच शेतकरी वर्गाच्या समस्यावर लिखाण करून साहित्य क्षेत्रात छोटीशी ओळख मिळवणारे अंगद दराडे यांना या निवडी बद्दल अनेक साहित्यीकांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत त्याच बरोबर साहित्य क्षेत्रातील सहकारी विशाल पाटील वेरूळकर, सौ शालू विनोद कृपाले (आई ), नरेंद्र पाटील, रोशन मस्के इत्यादी साहित्यिकांनी देखील त्यांचे अभिनंदन केले.