थोर संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांच्या कार्यालयात उत्साहानं साजरी

97

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.२३ फेब्रुवारी):-अज्ञान,अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबाबत जन जागृती निर्माण करणारे, थोर संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ यांच्या कार्यालयात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महान विभूतीस नमन करण्यात आले.

यावेळी, प्रामुख्याने डेबुजी फोर्स चे नांदेड जिल्हाध्यक्ष, बाळू ईकळीकर, अ.भा ओबीसी महा संघाचे विभागीय अध्यक्ष राजेश.एन भांगे साहेब, सुजलेगांव चे पोलीस पाटील निळकंठ पाटील,तसेच सक्रिय युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन सुरेशराव फुलारी,विश्वनाथ पाटील खराडे, गजानन फुलारी, अभिषेक पांचाळ, सुभाष पांचाळ बेटकबिलेलीकर, संग्राम बेलकर,अदी बांधव जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते,उपस्थित राहून प्रतिमेला अभिवादन केले.

संत गाडगेबाबा यांचे विचार आत्मसात करून आम्ही पण स्वच्छता राहण्यासाठी आमच्या परिसरात प्रयत्न करू अशी प्रतिज्ञा उपस्थितांनी घेतली, यावेळी स्वच्छता हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, ह्या एका गुणांमुळे माणसाचे जीवन सुंदर बनते,असे सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी आमच्या न्युज शी बोलताना व्यक्त केले,