म्हसवडचा बुधवारी होणारा आठवडी बाजार बंद

28
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

माण(दि.23फेब्रुवारी):-तालुक्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव पाहता तालुक्यात कोरोना रुगण संख्येत जास्तीची वाढ होत आहे.कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासन आदेशानुसार म्हसवड नगरपरिषदेने बुधवारी होणारा आठवडी बाजार बंद ठेवल्याचे आज सांगण्यात आले.नगरपरिषदेकडून आवाहन करणेत आले आहे की बुधवारी होणारा बाजार बंद असलेने शेतकरी,व्यापारी,दुकानदार परगावचे व्यापारी यांनी बाजार साठी येऊ नये.त्यादिवशी बाजार आणि मंडई भरणार नसून लोकांनी कोणत्याही खरेदीसाठी बाजारपेठेत येऊ नये.बाजार बंद असला तरी गावातील सर्व दुकाने खुली राहणार आहेत.

यादरम्यान गेल्या दोन दिवसांपासून म्हसवड नगरपरिषदेने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्याधिकारी सचिन माने यांच्या माध्यमातून धडक मोहीम चालू केली असून विना मास्क फिरणाऱ्याना आणि सोशल डिस्टन्सीगचे पालन होत नसलेल्या दुकानदारांना दंड आकारण्यात येत आहे आत्ता पर्यत शंभरपेक्षा जास्त लोकांना दंड केला आहे.नागरिकांनी त्रिसूत्री(मास्क,सेनिटायजर,सामाजिक अंतर) अवलंबावी असे नगरपरिषदेकडून वारंवार सांगण्यात येत आहे.असे असले तरी नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.