दलित मानवाधिकार कार्यकर्त्याची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

29

✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर,प्रतिनिधी जिल्हा)मो:-9860208144

अहमदपूर(दि.23फेब्रुवारी):-दि.नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीज महाराष्ट्र यांच्यावतीने मालवण येथील सेफ्राॅन हाॅटेल येथे 20 व 21 दोन दिवसीय राज्य स्तरीय मानवाधिकार कार्यकर्ता दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मानव अधिकार व अत्याचार पीडित या वर होणारे अन्याय अत्याचार तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्या संदर्भात दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे राज्य महासचिव तथा आंतरजातीय विवाह मसूदा कायदा समिती सदस्य अॅड डॉ केवल उके, तसेच दिल्ली येथील राष्ट्रीय समन्वयक अॅड नवीन गौतम यांच्या हस्ते व उच्च न्यायालय मुंबई चे अॅड बि जी बनसोड,नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टीज महाराष्ट्र संघटनेचे कार्यकारणीतसेच राज्य कार्यकारणी यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या शाळेसाठी सोलापूर,लातूर, पुणे, रायगड, मुंबई ,हिंगोली, वाशिम ,रायगड सिंधुदुर्ग व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग येथील रिपाईचे नेते तानाजी कांबळे, नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज महाराष्ट्र चे राज्य सचिव वैभवजी गिते,प्रा.रमाताई अहिरे, राज्य सहसचिव पि एस खंदारे,बि पी लांडगे, राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे, आदींची उपस्थित होती.

पहिल्या दिवशी प्रशिक्षणात कार्यकर्त्याचे मनोबल वाढवावे व कार्यकर्त्यां कार्य करेल.तसेच कार्यकर्त्यांवर येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी शोसल डिस्टन पाळून व मास्कचा वापर करून कार्यशाळेची सुरूवात करण्यात आली होती.दुसऱ्या दिवशी कार्यशाळेत दिल्लीवरून आलेले राष्ट्रीय समन्वयक नवीन गौतम यांनी बाल योवन शोषण कस्या प्रकारे होते.व राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत यांच्याकडे तक्रार कसी करावी या वर ही माहीती दिली.अॅड डॉ केवल उके यांनी क्राइम केस बाबत माहिती दिली व कार्यकर्त्यांची सार्वजनिक क्षैत्रातील भुमिका कसी असावी.यांच्या वर ही देण्यात आली.

दिल्लीच्या राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख डॉ देबजानी, अॅड राहुल सिंग व अॅड तनय गांधी ( अधिवक्ता,व अनुसन्धान विव्दान ) यांनीही आॅनलाई च्या माध्यमातून दोन दिवसीय कार्यशाळेस मार्गदर्शन केले.दिल्लीवरून आलेले श्री नवीन गौतम, अॅड डॉ केवलजी उके, अॅड बि जी बनसोड, वैभव गिते,प्रा.रमाताई अहिरे,पि एस खंदारे, प्रमोद शिंदे आदींनी पहिल्या दिवशी प्रशिक्षणात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेसाठी पंचशिलाताई कुंभारकर, शशिकांत खंडागळे, वैभव काटे, मराठवाडा उपाध्यक्ष संजय माकेगावकर, दिलीप आदमाने, संजय नवघरे, वैभव धाइंजे, नवनाथ भागवत, आदींनी परिश्रम घेतले.