हंगामी फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी द्या

46

🔸सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन ब्रम्हपुरी यांची मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.23फेब्रुवारी):- मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी संघटनेचे जिल्हा सचिव सुदाम भागडकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहावा वेतन आयोग पाच वर्ष उशिराने लागू करण्यात आला. दरम्यान या कालखंडातील थकबाकी कामगारांना अद्याप देण्यात आली नाही. मागणी करूनही शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. असे पत्रकार परिषदेत हंगामी फवारणी कामगारांनी केली, मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना पूर्वी वर्षातून चार महिने काम मिळत होते.

आता ते एक महिन्यावर आले. राज्यातील फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी 4 कोटी 5 लाख 59 हजार आहे. परंतु शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. ही थकीत बाकी रक्कम त्वरित द्यावी अन्यथा मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा पत्रकार परिषदेतून सुदाम भागडकर जिल्हा सचिव यांनी दिला. या पत्रपरिषदेला सोमेश्वर ठेंगरे तालुका अध्यक्ष , श्यामराव करानकर, सीताराम तुपट, हरिदार सोनडवले , नानाजी बोरकर, प्रकाश माटे आदी हंगामी फवारणी कामगार उपस्थित होते.