श्रीरामपूर येथील नवनिर्वाचित सरपंच आशिष काळबांडे यांचा भीम आर्मीतर्फे हृदयस्पर्शी सत्कार

30

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.24फेब्रुवारी):-तालुक्यातील शहरालगत असलेली एकमेव श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणारी ग्रामपंचायत श्रीरामपूर येथे नव्यानेच अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडलेले तरुण चेहरा असलेले नवनिर्वाचित सरपंच आशिष काळबांडे यांचा भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या जिल्हा यवतमाळ पुसद शहरच्या वतीने भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार शिल्पकार भारतरत्न प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, पुष्पगुच्छ देऊन भेट देऊन सत्कार करण्यात आला.

श्रीरामपूर ही ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिने तृतीय क्रमांकाची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाते. या ग्रामपंचायतीला भारताचे महामहिम राष्ट्रपती, यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने विशेष ग्रामपंचायत म्हणून असाही उल्लेख आहे .अशा उल्लेखनीय ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून मा. आशिषभाऊ काळबांडे यांना या ग्रामपंचायतचे सरपंच पद लाभल्याने सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भीम आर्मी एकता मिशनच्या या सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला .व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

या सत्कार समारंभाला उपस्थिती म्हणून भारतीय सेनेचे निवृत्त अधिकारी, मेजर नितिन धुळे,भीमआर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष, अशोक भालेराव, जिल्हा मुख्यमहासचिव धनराज कांबळे,महासचिव प्रसाद खंदारे,जिल्हा उपाध्यक्ष यशपाल काळबांडे,सरचिटणीस श्याम देवकुळे,पुसद तालुका महासचिव, प्रभाकर भालेराव,तालुका संघटक गोपाल जगताप, इत्यादी प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्तिथ होते.