सर्व सामान्य नागरिकांनाही कोरोनाची लस मिळावी

    34

    ?जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसची प्रशासनामार्फत पंतप्रधानांकडे मागणी

    ✒️जयदीप लौखे-मराठे,वेल्हाणे(धुळे प्रतिनिधी)

    धुळे(दि.24फेब्रुवारी):- जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा आता पुन्हा उद्रेक होताना दिसतो आहे. परिणामी पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .कोरोना बाबत लस उपलब्ध झाली असली तरी ती अद्याप समाजातील सर्व सामान्य घटकांना मिळालेली नाही. ही लस लवकरात लवकर गोर गरिबांनाही मिळावी, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉग्रेसने प्रशासनामार्फत पंतप्रधानांकडे केली आहे.

    जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की,
    लोकसभेतील गटनेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी केलेल्या सूचनेनुसार देशभरातून अशी निवेदने पंतप्रधानांना पाठविण्यात येत आहेत.संपूर्ण जगभरात कोरोना रोगाने थैमान घातले आहे.अशा कठीण परिस्थितीत आता पुन्हा एकदा कोरोना रोगाच्या संकटाने महाराष्ट्रात सुरूवात झालेली दिसत आहे. या संकटाला सर्वस्वी नागरिक जबाबदार आहे हे प्रथम दर्शनी दिसून येते. मात्र तरीही नागरिकांना वाऱ्यावर सोडुन केंद्र सरकारला चालणार नाही. हे कटू सत्य आहे. आतातर कोरोना रोगाची दुसरी लाट येते की काय, अशी शंका सर्व सामान्य जनतेला वाटू लागली आहे.यामुळे जनता भयभीत झाली आहे.

    आज देशभरात कोरोना रोगावरील प्रतिबंधक कोव्हॅक्सीन आणि कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. सुरुवातीला कोरोना योध्यांना लस देण्याचे सरकार च्या वतीने निश्चित करण्यात आले आहे. मात्र अशा संकटात ही अनेक कोरोना योध्यांनी अजून पर्यंत लस घेतलेली दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस ची मागणी आहे की, कोरोना योध्यांसोबत प्रत्येक घटकातील बंधू भगिनींना कोरोना रोगावरील प्रतिबंधक लस लवकरात लवकर देण्यात यावी. जेणेकरून कोरोना रोगावरील संकटातून सामान्य जनता मुक्त होईल.

    आपण शासकीय स्तरावरून आमची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत त्वरित पोहोचवावी, अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन देतांना..जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, शहराध्यक्षा सरोज कदम, जिल्हा कार्याध्यक्षा मालती पाडवी, शहर कार्यध्यक्षा तरुणा पाटील, जिल्हा सचिव रश्मी पवार, जिल्हाउपाध्यक्षा प्रितम देशमुख, धुळे तालुका अध्यक्षा मिनाक्षी पाटील, धुळे तालुका विधानसभा क्षेत्र माधुरी पाटील, साक्री रोहिणी कुवर उपस्थित होत्या..