संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुख्यमंत्री अभय देणार की राजीनामा घेणार याकडे जनतेचे लक्ष

25

✒️जयदीप लौखे-मराठे,वेल्हाणे(धुळे प्रतिनिधी)

मुंबई(दि.24फेब्रुवारी):- महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड हे गेल्या पंधरा दिवसांपासून पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात जास्त-जास्त अडकत जात आहेत. त्यातच काल संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे जाऊन संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत शक्तिप्रदर्शन केले. त्यावरूनही राठोड यांच्यावर राजकीय क्षेत्रात खूप मोठी टिका झाली.यानंतर आज संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईत जात आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची संजय राठोड हे मातोश्री या निवासस्थानी भेट घेतील. मुख्यमंत्री त्यांना अभय देणार की त्यांचा राजीनामा घेणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात कथीत मंत्री संजय राठोड व त्यांचा समर्थक अरुण राठोड यांच्या अनेक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या होत्या. या आधारावरून संजय राठोड यांच्यावर गुन्हा नोंद करा, यासाठी सर्वच राजकीय विरोधकांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी लावून धरली होती. त्यानंतर पोहरादेवी येथे दर्शन घेऊन आज संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.