प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्ह्याच्या वतीने कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी

    34

    ✒️भंडारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    भंडारा(दि.24फेब्रुवारी):/ प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची १४५ वी जयंती प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्हा कार्यालयात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ सरचिटणीस प्रा. शेखर बोरकर, प्रमुख मार्गदर्शक राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे उपस्थित होते.

    यावेळी प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत कर्मयोगी संत गाडगेबाबा व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ.देवानंद नंदागवळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.सूरज गोंडाने यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी प्रा दिलीप दहिवले, महेंद्र तिरपुडे,भीमराव बन्सोड,नागरतन रंगारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.