डॉ . हर्षल खर्चे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार व ग्लोबल चेंजमेकर अवॉर्डने सन्मानित

29

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.24फेब्रुवारी):- आंतराष्ट्रीय खेळाडू पटू डॉ. हर्षल राजेंद्र खर्चे ( बुलढाणा ) यांचे क्रीडा व सामाजिक कार्यामधील योगदानाबद्दल दि 19 फेब्रुवारी तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताचे औचित्त साधून या वर्षापासुनच सदरहु जिजाऊ बहुउद्देशी संस्थेद्वारा सम्मानित करण्यात आले.

सदरहु पुरस्कार पंचायत समीती सभागृह वैजापुर येथे आयोजित करण्यात आला असुन मा. श्री सुर्यकांत रामदास मोटे
पो. पा. गोयगाव तथा सचिव म. रा. गा. का. पो. पाटील संघ जि. सचिव औरंगाबाद व अध्यक्ष मा. श्री. अँड. धनराज आभोरे / सचिव मा .श्री. संतोष नामदेव दौड ( जिजाऊ बहुउद्येशीय सेवाभावी संस्था नागमठान ता. वैजापुर औ. बात )प्रमुख उपस्थिती मा. श्री . माणिक आहेर साहेब ( उपजिल्हाअधिकारी )मा.आ. श्री. रमेश बोरणारे सर , मा.श्री. अॅड. प्रमोद दादा जगताप ( मा. अर्थ व बांधकाम सभापती औरंगाबाद ) मा. श्री . कैलास प्रजापती साहेब( उपविभागीय पोलीस अधिकारी वैजापुर)मा.श्री. सम्राटसिंग राजपुत साहेब (पोलिस निरिक्षक वैजापुर ) श्रीमती . सारंगी महाजन (सारा फाऊडेशन ठाणे) मा. सौ. शिनाताई मिसाळ सभापती (प.स. वैजापुर )मा. सौ . शिल्पाताई परदेशी ( नगराध्यक्ष वैजापुर )मा. श्री . पंकजभाऊ ठोंबरे (जि. प. सदस्य) मा . श्री . बाबासाहेव पाटील (मा. सभापती )व इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली व 20 फेब्रुवारी नवी मुंबई हॉटेल योगी मिडटावून येथे ग्लोबल चेंजमेकर अवॉर्ड सन्मानित करण्यात आले.

सदरहू हा पुरस्कार श्री सुशील कुमार शिंदे (फॉर्मर होम मिनिस्टर),भारत सरकार ,पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री विजयकुमार शाह,श्री रंगनाथ नाईकडे (चीफ कांसोर वटोर ऑफ फॉरेस्ट आय.फ.स) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार विद्यापीठ आणि प्रोजेक्ट 100 व माणिनी फाउंडेशनच्या यांच्या आयोजन खाली पुरस्कार वितरण सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कारासाठी देश-विदेशातुन लोक आलेले होते.समाजात उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला.या पुर्वी सुद्धा डॉ. हर्षल खर्चे यांना आंतराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर संम्मानीत करण्यात आलेले आहे . यामध्ये प्रशासकीय ,राजकीय व धार्मीक आणि सामाजीक क्षेत्रातील मान्यवरा द्वारे सम्मानीत करण्यात आलेले आहे.निश्चितच हा पुरस्कार त्यांना प्रोस्साहीत करेल यात काही शंका नाही