परिते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मा.हनुमंत भोसले तर उपसरपंचपदी मा.लक्ष्मण लांडे यांची बिनविरोध निवड

38

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.25फेब्रुवारी):-माढा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या परिते ग्रामपंचायतीवर आ.बबनदादा शिंदे व आ.संजयमामा शिंदे पूरस्कृत ज्योतिर्लिंग ग्रामविकास आघाडीचे उमेदवार मा.हनुमंत अनंता भोसले यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी मा.लक्ष्मण नाथा लांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाल्याने हि निवड बिनविरोध पार पडली.नुतन सरपंच व उपसरपंच यांचे आ.बबनदादा शिंदे व आ.संजयमामा शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

सदर निवडी प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी, ग्रामसेवक,तलाठी, पोलिस पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व पार्टी प्रमुख मा.दादासाहेब देशमुख,मा.महादेव लांडे,मा.बाळकृष्ण जगताप,मा.अनिल मुसळे,मा.दत्तात्रेय लामकाने,मा.नवनाथ लामकाने,मा.गणेश लामकाने,मा.गोरख शेळके,मा.सुभाष उंबरकर,मा.नेताजी लांडे,मा.पोपट लांडे,मा.मोहन झांबरे,मा.महादेव मोरे,मा.सोमनाथ लांडे,मा.कुबेर भोसले,मा.संतोष लोखंडे,मा.गोविंद कुंभार,मा.भारत कुंभार,मा.बाळकृष्ण जोशी,मा.अभिमान जाधव,मा.लक्ष्मण कौलगे,मा.दगडू उंबरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.