कोपर्डीच्या स्व. श्रद्धाताईच्या माता- पित्याचे काल धुळ्यात आगमन

    40

    ?तिच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होत नसल्याची व्यक्त केली खंत

    ✒️जयदीप लौखे-मराठे,वेल्हाणे(धुळे प्रतिनिधी)

    धुळे(दि.26फेब्रुवारी):- सबंध देशभर गाजलेल्या कोपर्डी प्रकरणास सुमारे चार वर्षांचा कालावधी उलटून गेलेला असून देखील अद्यापपावेतो स्वर्गीय श्रद्धाताई सुद्रीक हिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली नाही. व तिला योग्य तो न्याय मिळत नसल्याची खंत तिच्या माता-पित्याने काल धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी व इतर समाजाच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केली. काल दि. २४ फेब्रुवारी रोजी तिच्या आईवडीलांचं धुळ्यात एका खाजगी कामानिमित्ताने आगमन झाले होते. तेव्हा धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ स्वागत केले. प्रथम त्यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

    यावेळी युवानेते श्री. यशवर्धनजी कदमबांडे यांनी त्या उभयंतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे सचिव निंबा मराठे, कार्याध्यक्ष प्रदिप जाधव, सहखजिणदार विरेंद्र मोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक साहेबराव देसाई, उद्योजक योगिराज मराठे,भोलाभाऊ वाघ, नानासाहेब कदम,नगरसेवक राजेश पवार, आबासाहेब कदम , अर्जुन पाटील, सचिन मराठे,विनायक भोसले, गणेश सुर्यवंशी, वाल्मिक मराठे, गोविंद वाघ , सुमित पवार,विनोद जगताप,बोरविहीरचे सैनिक चंदू चव्हाण, जितू इखे, शाम निरगुडे,भरत वाघारे, महेश गायकवाड, विकास बाबर, श्रीरंग जाधव ,अमर फरताडे, उमेश चौधरी, बाळू रावळे, कु. हिमानी वाघ, वामन मोहिते,विराज रावळे, निखिल बडगुजर,नागेश ताडगे, अमित खोपडे, सचिन बडगुजर,व इतर समाजाचे समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.