चंद्रपूर जिल्ह्यातील ऑनलाईन परिक्षा रद्द करण्याची रुग्णसेवक जिवन तोगरे यांची शिक्षण मंत्री यांच्या कडे मागणी

38

✒️विनोद उमरे(विशेष प्रतिनिधी)मो:-8766921326

चंद्रपूर(दि.25फेब्रुवारी):- जग जीवनमरण्याच्या परिस्थितीवर मात करत आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात आज महाराष्ट्राची स्थिती दिवसेंदिवस बिघडते आहे. सर्वच क्षेत्रातील लोकांची परिस्थिती हलाखीची झाली असून सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचे खच्चीकरण झाले आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या वतीन घेण्यात येणार्या ऑनलाइन परिक्षा रद्द करण्याची मागणी रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

अनेक विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये, आई-वडील भाऊ-बहीण आजी-आजोबा सगळेच कोरोनाच्या विळख्यात अडकले गेलेले आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. त्यात काही विद्यार्थ्यांच्या घरात खायला दोन वेळचे जेवण मिळेल की नाही इथपासून मारामारी सुरू आहे. एकीकडे पैशाचे आर्थिक चणचण मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे‌.

त्यामध्ये सध्याच्या काळात महाविद्यालये सुरू करण्यात आलेले आहेत त्यामुळे अशा सर्व मुलांनी हे परिक्षा कसे अटेंड करायचे असा प्रश्न जिवन तोगरे यांनी उपस्थित केला असून परिक्षा रद्द करण्याची मागणी ई-मेलच्या माध्यमातून त्यानी मुख्यमंत्री, उच्च व तज्ञ शिक्षक मंत्री यांच्याकडे केली आहे कोरोनाची परिस्थिती पूर्णतः संपुष्टात आली की मगच विद्यार्थ्याचे परिक्षा घेण्यात यावे. आताच्या काळात हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. अगोदर महाविद्यालय शाळा सुरू केल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांसमोरच्या अडचणी आपण वाढवू नयेत व सर्वसमावेशक असा निर्णय घेण्यात यावा असे मत रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी मांडले आहे