मराठवाड्याचे भूषण अनंतात विलीन

33

आपल्या परळीचे भूमिपुत्र मराठवाड्यातील पहिले भारतीय प्रशासन सेवेमधील सनदी अधिकारी श्रद्धेय भुजंगराव कुलकर्णी सर्वांचे लाडके “बाबा” यांचे वयाच्या 105 व्या वर्षी औरंगाबाद येथे वृद्धोपकाळाने निधन झाले,त्यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली.

औरंगाबादला गेल्यानंतर अनेकदा त्यांच्या घरी जावून भेट घेण्याचा योग आला.प्रत्येक भेटीमध्ये त्यांच्या प्रशासकीय अनुभवातील अनेक रंजक किस्से ऐकायला मिळायचे.मराठवाड्याप्रती अतिशय तळमळ असणारे ते सनदी अधिकारी होते.तरुणांनी राजकारणात येवून चांगले कार्य करावे ही त्यांची भावना असायची माझ्या जीवनात त्यांच्यासोबत झालेल्या भेटी माझ्यासाठी एक ठेवा आहेत.ना.धनंजयजी मुंडे साहेबांचे नेतृत्व त्यांना अगदी जवळचे वाटायचे राज्याचे नेतृत्व करायची क्षमता त्यांच्यामध्ये आहे असे ते नेहमी बोलून दाखवत.

निवृत्त प्रशासकीय अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन झाले.स्वतंत्र भारताच्या उभारणीचा साक्षीदार त्यांच्या रुपाने काळाच्या पडद्याआड गेला.त्यांनी नुकतेच १०४ व्या वर्षांत पदार्पण केले होते. आपल्या सेवा काळात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या.

स्वातंत्र्यपूर्व हैदराबाद संस्थानातील प्रशासकीय नोकरीतून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरवात केली. स्वतंत्र भारतातही जिल्हाधिकारी पदापासून सचिवस्तरापर्यंत प्रशासकीय क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केलं.स्वतंत्र भारताच्या पहिल्या जनगणनेचे महाराष्ट्र प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलं.

निवृत्तीनंतर मराठवाडा विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, दांडेकर समिती, न्हावाशेवा बंदर, अकृषी-विद्यापीठांची लेखासमिती, मराठवाडा ग्रामीण बॅंक, मराठवाडा वैधानिक मंडळ, कापूस एकाधिकार योजना पुनर्विलोकन समिती, राज्य सिंचन आयोग, अशा अनेक ठिकाणी ते कार्यरत राहिले.

त्यांच्या निधनामुळे कुलकर्णी कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

भावपूर्ण श्रद्धांजली.