खेरवाडी ग्रामपंचायतीवर महाआघाडीचा भगवा

31

✒️निफाड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

निफाड(दि.26फेब्रुवारी):-नारायणगाव खेरवाडी सेंट्रल रेल्वे ग्रामपंचायत तालुका निफाड येथे सरपंच उपसरपंच पदाची निवड संपन्न झाली या निवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न झाला ग्रामपंचायत सरपंच पद सर्वसाधारण स्त्री राखीव असे होते.सरपंचपदी शिवसेनेच्या सौ.अश्विनी दीपक जाधव व उपसरपंच पदी राष्ट्रवादीचे श्री.विजय रामचंद्र लांडगे यांची निवड.खेरवाडी ग्रामपंचायतीचे आज सरपंच उपसरपंच निवड करण्यात आली.

पंचायत समिती सभापती रत्नाताई शंकर संगमनेरे नेतृत्वाखाली व ग्रामपंचायत सदस्य सोपानराव राजाराम संगमनेरे, कैलास निवृत्ती संगमनेरे, रक्षा पप्पू उगले,उमेश वसंत पगारे,उषा किसन लांडगे, विमल भाऊसाहेब निपुगळे यांच्या गटाची ग्रामपंचायतीवरती सत्ता स्थापित झाली.या निवडीचे निफाडचे आमदार दिलीप काका बनकर मा.आमदार अनिल अण्णा कदम जिल्हा परिषद सदस्य दीपक भाऊ शिरसाठ व राष्ट्रीय विश्व गामी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक विजय भाऊ केदारे आदि खेरवाडी ग्रामस्थांनी स्वागत केले.