ईनरव्हील क्लबतर्फे हळदी कुंकू व कट्टा लोकार्पण कार्यक्रम संपन्न

23

✒️चोपडा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चोपडा(दि.26फेब्रुवारी):-येथील ईनरव्हील क्लबतर्फे यंदाही मकरसंक्रांत निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. हरेश्वर मंदिर परिसरात झालेल्या एका कार्यक्रमात हळदी कुंकू सोबत आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या निधीतून ईनरव्हील क्लबतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या ‘ईनरव्हील फारेस्ट व बालोद्यान’ मध्ये समर्पित सिमेंटच्या तीन बाकांचे उद्घाटन (कट्ट्याचे) लोकार्पण क्लबच्या डिस्ट्रिक्ट व्हाईस चेअरमन सौ.अश्विनी गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी क्लब अध्यक्षा शैला सोमाणी होते.

याप्रसंगी डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी अश्विनी गुजराथी यांच्या निवडीबद्दल क्लबच्या वतीने अध्यक्ष शैला सोमाणी यांच्या हस्ते शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रा.सौ.सविता संजय सोनवणे यांना उमवि तर्फे डॉक्टरेक्ट पदवी मिळवल्याबद्दल डि.चेअरमन अश्विनीबेन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

भगिनींनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तर सौ.अश्विनी गुजराथी,व माजी अध्यक्ष डॉ. कांचन टिल्लू यांनी नवीन सदस्यांनी क्लबच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करित क्लबच्या कार्याची माहिती दिली.क्लबच्या कट्टा उभारणीने मंदिर परिसरात येणाऱ्या भक्तांच्या व वयोवृद्ध मंडळींची बैठकीची सोय झाली आहे, या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होते आहे. या प्रसंगी सौ.मंजु अग्रवाल, सौ.अंकिता जैन, सरला राजपूत, किरणताई पालीवाल,नितू अग्रवाल,उर्मिला राजपुरोहित, रूपाली काबरा, चेतना बडगुजर, ज्योती वारके, रोहिणीताई देशपांडे, आदी सदस्य उपस्थित होते. प्रारंभी क्लब अध्यक्ष शैला सोमाणी यांनी सर्वांचे स्वागत केले, तर सेक्रेटरी अंकिता जैन यांनी आभार प्रदर्शन केले