आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

    70

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.26फेब्रुवारी):- सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. तरी पालक वर्गानी या मोफत शिक्षणाचा लाभ घ्यावा.

    सर्व पालकांना कळविण्यात येते की, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे.

    दरवर्षी प्रमाणे सन 2021-22 या वर्षाची आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून आपल्या जिल्ह्यातील शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण होणे आवश्यक आहे. तरी दि. 03/03/2021 ते दि. 21/03/2021 या कालावधीमध्ये पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.आवश्यक कागदपत्रे वडिलांचा उत्पन्नाचा दाखला, वडिलांचा आधार कार्ड वडिलांची जात प्रमाणपत्र, मुलांचा आधार कार्ड , मुलांचा जन्माचा दाखला, तरी याबाबत आपण आपल्या पाल्याच ऑनलाईन अर्ज भरून चांगलं शिक्षण देण्याचं करावे.