शेंदुर्णीची कन्या सौ.अर्चना दुसाने-सोनार यांची पोलीस निरीक्षक म्हणुन पदोन्नती

25

✒️जयदीप लौखे-मराठे,वेल्हाणे(धुळे प्रतिनिधी)

धुळे(दि.26फेब्रुवारी):-येथील रहिवासी सौ.अर्चना दुसाने-सोनार यांची नुकतीच पोलीस निरीक्षक म्हणुन पदोन्नती झाली आहे. लोहमार्ग मुंबई येथे पोलीस निरीक्षक म्हणुन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अतिशय गरीब परिस्थिती, वडिलांचे छत्र हरवलेले,आईने कष्टाने दोन्ही मुलींना वाढवले उच्च शिक्षण पुर्ण करत या मुलींनी आईच्या कष्टाचे चीज करत शेंदुर्णीत महिलांच्या मध्ये पोलीस निरीक्षक पदापर्यंत पोहचणारी प्रथम व्यक्ती म्हणुन सौ.अर्चना दुसाने-सोनार यांची गणना होत आहे.प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शेंदुर्णीत घेतले असुन आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालयाच्या त्या माजी विद्यार्थीनी आहे.

सौ.अर्चना दुसाने-सोनार यांची स्पर्धा परिक्षेत यशस्वी होत २००९ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणुन निवड झाली. त्यांनी नागपुरात अंबाझरी पोलिस ठाण्यात क्राईम ब्रँच ला प्रथम काम केले. तदनंतर ठाणे ग्रामीण भागात काशिमीरा,शहापुर येथे सपोनि म्हणुन यशस्वी कार्य केले. पालघर जिल्ह्यातील तुळींज पोलीस ठाण्यात काम करत असतानाच पोलिस निरीक्षक म्हणुन आता मुंबई लोहमार्ग येथे पदोन्नती झाली आहे.त्यांच्या या नियुक्ती बद्दल समस्त शेंदुर्णीकरांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.