भारतीय पत्रकार संघाच्या सांगली जिल्हाध्याक्ष पदावर प्रसाद कडव यांची निवड

    36

    ✒️सांगली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    सांगली(दि.27फेब्रुवारी):-जिल्ह्यातील दिघंचीचे युवा पत्रकार तथा आपला महाराष्ट्र न्यूज पोर्टल चे संपादक प्रसाद कडव यांची भारतीय पत्रकार संघाच्या सांगली जिल्हाध्याक्ष पदी यांची निवड झाली आहे. यावेळी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे विभागीय अध्यक्ष कैलास पठारे पाटील यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार, राष्ट्रीय अध्यक्ष विक्रमजी सेन तसेच उपाध्यक्ष जयपाल पाटील यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष मोहम्मद सईद शेख यांनी प्रसाद कडव यांना निवडीचे पत्र दिले आहे.

    प्रसाद कडव गेली 5 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली सेवा देत आहेत.सध्या ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ मुंबईच्या सांगली जिल्हाच्या प्रसिद्धी प्रमुख या पदावर देखील आहेत. मागील वर्षी भोपाळ (मध्य प्रदेश ) येथे यांना ग्लोबल अचिव्मेंन्ट या अंतरराष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे.सामाजिक प्रश्नावर लिखाण करत यांनी आपला लेखनी समाज्यासाठी मजबूत केलेली आहे. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांन मध्ये प्रबोधनाचे काम ते करत आहेत.कॉलेज शाळांच्या माध्यमातून नवीन पिढीस मार्गदर्शन करत आहेत.यांच्या या निवडीने परिसरातून कौतुक होत आहे.