शंभुसेना सामाजिक संघटनेत अनेक तरुणांसह जेष्ठ नागरिकांचा प्रवेश सोहळा संपन्न

32

✒️जयदीप लौखे-मराठे,वेल्हाणे(धुळे प्रतिनिधी)

धुळे(दि.27फेब्रुवारी):- धुळे तालुक्यातील अंचाडे(तांडा) येथेआज दिनांक 26 फेब्रुवारी 2021 रोजी शंभुसेना सामाजिक संघटना व युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मुकटी विभागीय बैठक व शंभुसेना सामाजिक संघटना प्रवेश सोहळा व पद नियुक्ति कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी मुकटी विभागातील अनेक तरुणांनी ज्येष्ठ नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शंभुसेना सामाजिक संघटनेत प्रवेश केला यावेळी शंभुसेनेच्या बैठकीत शेतकरी विद्यार्थी व तरुणांच्या समस्या जाणुन घेतांना शंभुसेनेचे युवा जिल्हाध्यक्ष जयदिप लौखे-मराठे यांनी समस्या जिल्हा व राज्य स्तरावर सोडवु असा विश्वास अंचाडे(तांडा) व विभागातील ग्रामस्थांनी दिला.

शंभुसेना युवा जिल्हाध्यक्ष जयदिप लौखे-मराठे यांचे अंचाडे(तांडा) येथे आगमन झाल्यानंतर त्यांचा अंचाडे(तांडा) शंभुसेनेच्या वतीने विभागप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य एकनाथ जाधव यांनी पुष्पहार देवुन सत्कार केला.त्यानंतर अंचाडे(तांडा) गावाचे सरपंच व महाराष्ट्र पोलीस म्हणून ज्यांनी कोरोना काळात आपली ड्युटी चोकपणे बजावणारे मा.सुदाम भाऊ जाधव यांचा कोरोना योध्दा पुरस्कार देवुन सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला शंभुसेना युवा जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष जयदिप लौखे-मराठे, तालुकाध्यक्ष अरुण पवार, विभाग प्रमुख एकनाथ जाधव, गावाचे उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व मुकटी विभागातील शंभुसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

🎤 *शंभुसेना सामाजिक संघटनेत प्रवेश करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांचे शंभुसेना परिवारात सहर्ष स्वागत करतो. मा.सुदाम भाऊ जाधव यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा शंभुसेनेच्या वतीने सन्मान करतो. ज्या कार्यकर्त्यांना आज पद नियुक्त्या देण्यात आल्या त्या दोघी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन…! व त्यांना भावी वाटचालीस शिव-शंभुमय भगव्या शुभेच्छा देतो.