ओ.बी.सी. समाजाला ॲट्रॉसिटी कायद्याचा लाभ द्या – प्रहार जनशक्ती पक्ष

21

🔸प्रहार जनशक्ती ब्रम्हपुरी पक्षाकडून उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.26फेब्रुवारी):- एकंदरीत ओ.बी.सी. समान हलाखीचे जीवन जगत आहे. तो पिचलेला समाज असून त्याचे सर्व समाजाकडून आर्थिक व सामाजिक शोषण होत असून पदोपदी त्याचा अपमान होत आहे. तसेच मुख्यत्वे समाजात मागासवर्गीय व ओ.बी.सी. समाजात या कायदाने संघर्ष निर्माण होवून जातीय तेढ निर्माण होत आहे. त्याचा गैरफायदा उच्चवर्णीय घेत असून जाणीवपूर्वक हा कायदा तयार करण्यात आला मा. सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिक चौकशी केल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात यावा असा ऐतिहासिक निर्णय दिला.

असतांना केंद्र शासनाने जाणीवपूर्वक समाजात दुफळी तयार करण्यासाठी कड़क कायदा तयार केला. आजच्या परिस्थितीत ओ.बी.सी. हा पिचलेला शोषित समाज तयार झालेला आहे. त्यामुळे त्याला ॲट्रॉसिटी कायद्याचा लाभ देण्यात यावा. याकरिता उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे सेवक अँड. हेंमंत उरकुडे यांच्या नेतृत्वत निवेदन देण्यात आला. जेणेकरून समतोल राखला जाईल. बरेचदा काही ठराविक व्यक्ति यांनी ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करुन निरपराध लोकांचे विरुद्ध खोट्या तक्रारी दिल्याचे सिद्ध झालेले आहे आणि त्यामुळे बऱ्याच निरपराध लोकांचे आयुष्य धुळीस मिळाल्याचेही बरेच दाखले समाजात आहेत.

त्यामुळे ॲट्रॉसिटी कायद्यात सुधारणे होणे आवश्यक व गरजेचे झालेले असून प्राथमिक चौकशी केल्याशिवाय गुन्हा दाखल करण्यात येऊ नये, तसेच खोटी फिर्याद दिल्यास फिर्यादीवर कड़क कारवाई करण्याची तरतूद करून फिर्यादीला मिळणारी सानुग्रह रक्कम रु.3,00,000/- शासनाने फिर्यादीकडून परत मागावी अशी अपेक्षित सुधारणा कायद्यात करण्यात यावी.करिता प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सेवक अँड. हेमंत उरकुडे, अँड. सुधीर तलमले , बंडू उरकुडे, अँड. मिसार, अँड. देवीकर, अँड. डोहींझर, अँड कुथे, व प्रहार जनशक्ती पक्षाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते..