राष्ट्रीय विज्ञान दिवस

27

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे. डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली २८ फेब्रुवारी.

लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो.मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप, प्रयत्न आणि कृत्ये प्रदर्शित करणे.सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी हे साजरे केले जाते.देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणे.लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी.

✒️लेखक:-गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र
अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र