चिमूर पोलिसांनी ओढला श्रीहरी बालाजी महाराज यांचा रथ

27

🔹कोरोना संचारबंदी नियमाचे पालन करून मोजक्या भक्तांचे उपस्थितीत निघाली रथ मिरवणूक

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.27फेब्रुवारी):-येथील श्रीहरी बालाजी देवस्थानच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेली घोडा रथ यात्रा या वर्षी कोरोना राष्ट्रीय संकटामुळे रद्द करण्यात आली. पारंपरिक पुजा-अर्चना मंदिरातच काही मोजक्या सेवेकरी यांचा उपस्थितीत सर्व शासकीय नियमांचे पालन करून सुरू आहे.पारंपरिक पद्धतीने दरवर्षी यात्रे दरम्यान श्रीहरी बालाजी महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढली जाते, मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे मिरवणूक दरम्यान गर्दी केली जाऊ नये,याकरिता देवस्थान ट्रस्ट व पोलीस विभागाचे वतीने विशेष काळजी घेतली गेली.

श्रीहरी बालाजी देवस्थान कमिटी व चिमूर पोलीस विभागाचे शिस्तबद्ध नियोजनामुळे गर्दी टाळता आली.
उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे (भपोसे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहोड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, मात्र गर्दीच नसल्यामुळे पोलिसांचे चेहऱ्यावर ताण कमी होता.दरवर्षी गर्दी व अन्य बंदोबस्तात व्यस्त राहणारे पोलीस कर्मचाऱ्यांनी यावर्षी श्रीहरी बालाजी महाराज यांचा रथ ओढण्याचे कामात विशेष सहकार्य केले.

यात्रेच्या इतिहासात प्रथमच रथ ओढण्याचे कामात सहकार्य करता आले, याबाबत पोलिसांनी समाधान व्यक्त केले.संकटकाळात नेहमीच सहकार्य करण्याचे काम चिमुरकारांनी केल्याचा इतिहास आहे, याच इतिहासाचा कित्ता गिरवत यावर्षी चिमुरकारांनी ऑनलाइन स्थानिक केबल वाहिनीचे माध्यमातून घरीच दूरदर्शनवर श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले.