बिकली येथील वासुदेवजी गेडाम कुटूंब आले उघड्यावर ; शासनातर्फे 2 वर्षापासून कसलीही मदत नाही

    62

    ✒️विनोद उमरे(विशेष प्रतिनिधी)मो:-8766921326

    नागभिड(दि.27फेब्रुवारी):- तालुक्यातील बिकली येथील वासुदेवजी गेडाम यांचे 2019 मध्ये अतिवृष्टी पाऊसामुळे पुर्ण घर पडले. गेडाम व याची पत्नी अंपग आहे. कुंटूब उघड्यावर आल्याने गावकऱ्यांनी तात्पुरते ग्राम पंचायत मधील खाली रुममध्ये राहण्यास दिले.पटवारी यांनी पंचनामा करून गेली दोन वर्षे लोटली माञ त्याचा एक रुपया गेडाम कुटूंबाना मिळाला नाही. ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी घरकुल योजना लाभ देऊ या खोट्या आश्वासनावर ठेऊन दोन वर्षापासून त्यांना घरकुल मिळाले नाही व ग्राम पंचायत संबधित अधिकाऱ्याद्वारे ‘ग्राम पंचायतची रुम सोडण्याची वारंवार धमकी दिली जात होती.

    याची माहिती दिनांक 26/2/2021 ला अक्षय उईके यांनी दिली असता भारतीय क्रांतिकारी संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. वास्तविक परिस्थितीची माहिती घेतली व ग्राम सेवक याचेशीं फोनवर विचारणा केली. त्याचक्षणी संरपंच व उपसरपंच यानां घटनास्थळी बोलवून मिंटीग घेतली.भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा यानी, ‘जो पर्यंत घरकुल मिळणार नाही तो पर्यंत गेडाम कुटुंब ग्राम पंचायत मध्येच राहणार.नवनियुक्त संरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकानी गेडाम यानां लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभ देऊ असे आश्वासन दिले आहे.

    यावेळी भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा, उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा, शहर अध्यक्ष नंदूभाऊ खापर्डे, शहर सचिव परवेज साबरी, तालुका महासचिव चंद्रशेखर नारायणे, पाशाभाई पठाण, संदीप दोडके, अक्षय उईके इत्यादी पदाधिकाऱ्यानी व उपस्थित गावकऱ्यांनी बेघर असलेल्या अन्यायग्रस्त कुंटूबियानां घरकुल योजनेचा लाभ द्या अशी मागणी यावेळी केली.भारतीय क्रांतिकारी संघटनेतर्फे वासुदेवजी गेडाम यांचे अंपग पत्नीचे अंपग सर्टिफिकेट काढण्यासाठी मदत केली जाईल असे चद्रशेखर नारायणे यानी म्हटले. भारतीय क्रांतिकारी संघटनेतर्फे गेडाम कुंटूबियानां न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.